Ad will apear here
Next
गायन-वादनाच्या मेजवानीसह ‘मित्र महोत्सवा’चे आयोजन
नीलाद्री कुमार, महेश काळे, साबीर सुलतान खान, मंजिरी असनारे-केळकर यांना ऐकण्याची संधी

पुणे : मित्र फाउंडेशनच्या वतीने शनिवार, २३ नोव्हेंबर व रविवार, २४ नोव्हेंबर रोजी मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगर डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे दोन्ही दिवस सायंकाळी ५.३० वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार आहे.

‘महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून दर्जेदार शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे,’ अशी माहिती मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले यांनी दिली. 

महोत्सवाची सुरुवात शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या गायनाने होणार आहे. या वेळी निखिल फाटक (तबला), राजीव तांबे (हार्मोनियम), प्रसाद जोशी (पखवाज), उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) हे त्यांना साथसंगत करतील. यानंतर साबीर सुलतान खान यांचे सारंगी वादन होणार असून, त्यांना रामदास पळसुले हे तबल्याची साथ करणार आहेत.

रविवारी, २४ नोव्हेंबर रोजी जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजिरी असनारे केळकर यांचे गायन होणार आहे. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), संजय देशपांडे (तबला) हे साथसंगत करतील. महोत्सवाचा समारोप जगविख्यात सतार वादक पंडित रविशंकर यांचे शिष्य सुप्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांच्या वादनाने होणार असून, त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य व पुत्र सत्यजित तळवलकर तबल्याची साथसंगत करणार आहेत.

‘फाउंडेशनच्या वतीने २००४ सालापासून शास्त्रीय संगीत क्षेत्रातील वयोवृद्ध गुरुजनांना गौरव निधी दिला जातो. पं. सुधीर माईणकर यांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गौरव निधी प्रदान करण्यात येईल. आतापर्यंत तब्बल ६० जणांना हा गौरव निधी देण्यात आला असून, रुपये ११ हजार असे याचे स्वरूप असते. याशिवाय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तरुण तबला वादकांना तबले व तरुण गायकांना शिष्यवृत्तीदेखील प्रदान करण्यात येणार आहे,’ असेही  गोखले यांनी सांगितले.

महोत्सवाच्या प्रवेशिकेसाठी १०० रुपये शुल्क असून,   सोमवार १० नोव्हेंबरपासून पंडित फार्म्स (सकाळी १० ते ६ या वेळेत), नावडीकर म्युझिकल्स, कोथरूड (सकाळी १० ते १व सायं. ४ ते ८ या वेळेत), पीएनजी ब्रदर्स, लक्ष्मी रस्ता (सकाळी ११ ते ८ या वेळेत) या ठिकाणी उपलब्ध होऊ करण्यात आल्या आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVCCG
Similar Posts
पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’ पुणे : नुकतीच सुरू झालेली थंडी... सभोवताली पसरलेली धुक्याची शाल... अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर...अशी मंगलमय सकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.
संगीतमय वातावरणात ‘मित्र महोत्सव’ साजरा पुणे : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील घरंदाज गायकी, अवीट सुरांचा गोडवा, अनवट रागांची मेजवानी, कधी प्रेमाने भरलेल्या सारंगीचा करुणामयी सूर, तर कधी सतारीचा झंकार... अशा संगीतमय वातावरणात ‘मित्र महोत्सव’ साजरा झाला.
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language